सध्या महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा पाहायला मिळत आहेत.. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील सभांनंतर आता मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेची तयारी करण्यात महाविकास आघाडीचे नेते व्यस्त आहेत. मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेकडून (ठाकरे गट) अनिल परब आणि काँग्रेसकडून भाई जगताप यांनी माध्यमांशी बातचित केली.
अनिल परब म्हणाले की, १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसीठी तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं होतं. सभेच्या नियोजासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…
यावेळी परब यांना विचारण्यात आलं , शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील म्हणतात की, सभा उधळवून लावण्यात आम्ही माहीर आहोत. उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल ते असं बोलले आहेत यावर काय प्रतिक्रिया द्याल. त्यावर परब म्हणाले, आम्ही सध्या सभा घेणारे आहोत, उधळवणारे नाही. सध्या आम्हाला सभा घ्यायची आहे, उधळवायची नाही. ज्यांना उधळवायची आहे त्यांनी यावं.