विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदार पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर नार्वेकरांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल नार्वेकरांकडे सोपवला होता. परंतु, नार्वेकरांनी ठाकरे गटाविरोधात निकाल दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण जनतेच्या न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाकरे गटाने मंगळवारी (१६ जानेवारी) वरळी येथे महापत्रकार परिषद बोलावली. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न विचारण्याआधी विधीज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, नार्वेकरांनी दिलेला निकाल आणि आमदार अपात्रता प्रकरणाचं विश्लेषण केलं. त्यापाठोपाठ आमदार अनिल परब यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केलेले पुरावे जनतेसमोर मांडले.
“नार्वेकरांच्या उपस्थितीत घटनादुरुस्ती, उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुखपद”, अनिल परबांनी भरसभेत दाखवला २०१३ चा VIDEO
अनिल परब म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधीमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही. विधीमंडळासह मूळ राजकीय पक्ष, त्याची घटना, संघटनात्मक रचना आणि इतर चाचण्या घेणं गरजेचं आहे.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-01-2024 at 18:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab share 2013 shivsna internal election video of rahul narwekar uddhav thackeray asc