१०० कोटींच्या वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री उशीरापर्यंत चौकशी करुन मध्यरात्री अखेर अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर त्यांच्या विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर मध्यरात्री दोन वाजता ट्वीट करत एक मोठा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या ट्विटमध्ये सोमय्या म्हणतात, अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केली. आता अनिल देशमुख नंतर अनिल परब.

किरीट सोमय्यांचे अनिल परबांवरचे आरोप…

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचंही काऊंटडाऊन सुरू झालेलं आहे, असं विधानही सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)काल मध्यरात्री अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab will be next bjp leader kirit somaiya and nitesh rane tweets after anil deshmukh arrest vsk