दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांगली : त्याचा मृत्यू अपघाताने झाला की, कुठल्या आजाराने याची पुसटशी कल्पनाही त्या मुक्या प्राण्यांना नव्हती, मात्र, शिंगरू आता उठेल, मग उठेल अथवा मदतीसाठी काही करता येईल का, याच विवंचनेत दोन घोडे दीर्घकाळ आष्टा भिलवडी रस्त्यावर मंगळवारी उशिरापर्यंत प्रतीक्षेत होते. ना शिंगरू उठले, ना मदतीसाठी कोणी धावून आले. मुक्या प्राण्यांच्या भावनाही मुक्याच ठरल्या.

रस्त्यावर एखादा अपघात झाला तर जखमीला मदत करण्याऐवजी अपघाताचे चित्रीकरण करण्यासाठी बघ्यांची गर्दी बऱ्याच वेळा पाहण्यास मिळते. माणसांच्या बाबतीत मदतीलाही धावले जाते. मात्र, तेच महामार्गावर एखादा प्राणी जखमी वा मृतावस्थेत पडलेला आढळला तर हीच गर्दी त्याकडे कानाडोळा करून मार्गस्थ होण्यातच धन्यता मानते.

हेही वाचा >>>गणभक्त चाकरमान्यांना गावी ये-जा  करण्यासाठी ज्यादा रेल्वे सोडाव्यात, श्रीनिवास पाटील यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी

मंगळवारी आष्टा भिलवडी रस्त्यावर मंगळवारी हेच दृश्य मानवतेवर प्रश्नचिन्ह लावून गेले. या रस्त्याच्या कडेला मंगळवारी एक शिंगरू अचल अवस्थेत पडले होते. या पिलाची काहीच हालचाल होत नव्हती. ते अपघातात जखमी होते की त्याला कुठल्या आजाराने पछाडले होते हे कळायला मार्गच नव्हता. मात्र त्याच्या या मरणासन्न अवस्थेकडे चक्क कानाडोळा करत त्या रस्त्यावरून जाणारे जात होते. त्याच्या वेदनेची जाणीव चालणाऱ्या कुठल्याच माणासापर्यंत पोहोचत नव्हती. बोलता येत नसल्याने मुक्या जीवाच्या वेदनाही अबोल ठरल्या होत्या. अखेर त्याची ही आर्त हाक कदाचित त्याच्या जातभाईंना जाणवली असावी. त्या रस्त्यावरून निघालेले दोन घोडे आपल्याच या जातभाईची ही अवस्था पाहून थबकले. या मृतावस्थेतील शिंगरूजवळ ते उभे राहिले. ते त्याला चाटू लागले, धीर देऊ लागले. मदत मिळेल, पुन्हा पिलू उठून त्याच्या वयाला शोभेल असे बागडेल ही आशा त्यांना असावी. दरम्यान हे दृश्य काही प्राणीमित्रांच्याही नजरेस पडले, त्यांनी प्रयत्न सुरू केले पण तोवर उशीर झाला होता. त्या दोन घोडय़ांच्या साक्षीनेच त्या शिंगरूने तोवर प्राण सोडला होता.