अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे. मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा सुरू होती. यात विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची आणि जेवणासाठी वेगळी पंगत बसण्याचीही परंपरा होती.

त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवी ट्रस्टकडून या गावजेवणाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये साधारण १० हजार लोक जेवण करतात. मात्र, गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न वेगळे शिजवले जाते. या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर समाजबांधवापासून वेगळी बसते, असा महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील कार्यकर्त्यांनी आरोप केला होता. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच हे गावजेवण होते. हे गावजेवण रविवारी (२३ एप्रिल) होणार होते. मात्र , अंनिसने विशिष्ट समाजासाठी वेगळा स्वयंपाक करणे आणि त्यांच्या वेगळ्या पंगती बसवण्याला विरोध केला. त्याबाबत प्रशासनालाही निवेदन देत हस्तक्षेपाची व कारवाईची मागणी केली.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

अंनिसने अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना दिले. त्यांच्याशी या पंगतभेदाबाबत सविस्तर चर्चा केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे आणि त्यांची वेगळी पंगत बसविणे ही राज्य घटनेशी विसंगत अनिष्ट व अमानवीय प्रथा आहे. तसेच सामाजिक विषमतेला बळ देणारी गोष्ट आहे, असं सांगितलं. यानंतर तहसिलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून समज दिली. पोलीस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून एकोप्याने राहण्याच्या आणि सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घेण्याच्या अंनिसच्या मागणीला पाठबळ दिलं.

अंनिसच्या आवाहनाला ट्रस्टींकडूनही सकारात्मक प्रतिसाद

विशेष म्हणजे ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना एकाच पंगतीत भोजन घेण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा संपुष्टात आली. यात महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि तहसिलदार, पोलीस प्रशासन आणि महादेवी ट्रस्टने धाडस दाखवले. यातून हे यश आल्याची भूमिका अंनिसने मांडली.

“माणसामाणसातील भेदभाव थांबविला पाहिजे”

ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव माणसामाणसात भेद केला जात असेल तो सूज्ञांनी पुढे होऊन थांबविला पाहिजे, असे आवाहन यावेळी अंनिसच्यावतीने करण्यात आले.

हेही वाचा : “त्र्यंबकेश्वरमध्ये अजूनही जातिभेद, गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती”, अंनिसचा गंभीर आरोप, म्हणाले…

त्र्यंबकेश्वर अंनिस कार्याध्यक्ष संजय हराळे म्हणाले, “गाणजेवण पंगतभेद होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. तशा प्रकारच्या तक्रारी स्थानिक भाविकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शाखेला सोबत घेऊन प्रशासन व ट्रस्टींशी सुसंवाद केला. त्यातून हे परिवर्तन झाले आहे. अंनिस याचे स्वागत करत आहे.”

यात अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, अॅड. समीर शिंदे, संजय हरळे यांचा सहभाग होता.

Story img Loader