प्रख्यात निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता धर्माधिकारी यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिता धर्माधिकारी यांचा जन्म २२ सप्टेंबर १९५२ साली मंडणगड येथे झाला होता. १९७४ साली त्यांचा विवाह निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी झाला. निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांनी अप्पासाहेबांना मोलाचे सहकार्य केले होते. बैठकांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे यासारख्या उप्रकमात त्यांचे श्रीसंप्रदायाला मौलिक मार्गदर्शन मिळत आले होते. त्यामुळे त्यांना माई नावानेही संबोधले जात होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली. जिल्ह्यातील विविध भागातून श्री संप्रदायाचे हजारो दासगण रेवदंड्यात दाखल झाले. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रेवदंड्यातील हरेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा