Anjali Damania allegations on Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने मांडले जात आहे. यादरम्यान दमानिया या मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. आज पुन्हा दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रमंडळातून काढले जावे अशी मागणी केली आहे. “जो पर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही. म्हणून मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले. मग कराड आणि धनंजय मुंडे कंपन्यात एकत्र कसे आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार, मिळालेला नफा, दहशत असो… ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मी असं दाखवलं की, एका राज्यमंत्र्यांला राज्याच्या कंपनीकडून थेट नफा मिळतोय. बॅलेन्स शीटवर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे. तरी देखील काही झालं नाही”.

चार दिवस थांबून मी कृषी घोटाळा काढला. त्याच्याच कशा पद्धतीने साध्या ९२ रूपयांच्या नॅनो युरियाची २२० रुपयांनी खरेदी केली याबद्दल माहिती दिली. नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीच्या बाटल्या मी मागवल्या आणि त्याच्या किंमती मी ट्वीट केल्या. चार तारखेला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पाच तारखेला त्या बाटल्या मागवल्या आणि त्यानंतर सात तारखेला या कंपनीकडून बंदी घालण्यात आली. असं सांगण्यात आलं की कोणत्याही ऑनलाईन कंपन्या इफकोची उत्पादनांची विक्री करू शकत नाहीत, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

इफकोमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा देखील मुद्दा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला. कृषी घोटाळा नंबर २ चा उल्लेख करत, यामध्ये धनंजय मुंडे कोणत्याही पद्धतीने वाचत नाहीत असेही अंजली दमानिया म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं एक पत्र माध्यमांना दाखवले. हे पत्र मंत्र्‍यांनी लिहिलेले आहे पण त्यावर तारीख टाकण्यात आलेली नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितले.

पत्र वाचून दाखवत अंजली दमानिया म्हणाल्या की, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीती विचारार्थ ठेवण्यात आलेला, मंजुर झालेला कृषीविभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आला असे पत्रात लिहिले आहे. पण अंजली दमानिया यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचा दावा केला. “याचा अर्थ हा मंत्री कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. २३ आणि ३० तारखेला कुठल्याही प्रकारचा असा निर्णय झालेला नाही,” असे अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.

या पत्राच्या आधारावर ११ ऑक्टोबर या तारखेला जीआर काढला गेला. यामध्ये दोन गोष्टी केल्या आपल्याला अतिरिक्त ५०० कोटी देण्यात यावे, आणि २०० कोटी होते जे मी मागचा घोटाळा काढला त्यात म्हटलं होतं की २०० कोटींचे नंतर बॅटरी स्पेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप घेतले गेले ते वेगळे या दोन्हींना याच जीआरमधून मंजूरी देण्यात आली. पण हे कधी नव्हतंच. कॅबिनेट बैठक २३ आणि ३० तारखेची पण बघा. यात २०० कोटींबद्दल एक शब्दही लिहिलेला नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या.