Anjali Damania on Santosh Deshmukh Murder Case : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सातत्याने भाष्य करत आहेत. या प्रकरणातील आरोपी, त्यांना पाठिशी घालणारी व्यवस्था व नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांनी या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत (पोलीस चार्जशीट रिपोर्ट) वाचून काही मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष वेधलं आहे. त्या म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो तपास चालू आहे, त्यातील एका गंभीर मुद्द्याकडे मला सर्वांचं लक्ष वळवायचं आहे. सीआयडीचा तपास व एसआयटीकडून चाललेली चौकशी ही संतोष देसमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी चालू होती. केवळ खंडणीचा आरोपी शोधण्यासाठी हा तपास हाती घेतला नव्हता. असं असूनही नेमक्या कोणत्या गुन्ह्यांखाली वाल्मिक कराडला अटक केली? त्याला खंडणीप्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडे खंडणी प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा