Anjali Damania on Dhananjay Munde : परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून कोणत्याही परवानगीशिवाय होणारी राख वाहतूक, वाळूउपसा यासह विविध अवैध धंद्यांमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असून, याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कराड याला संरक्षण मिळत असल्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे केवळ खंडणी प्रकरणात नव्हे, हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावे, तसेच या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून करण्यात आली. याप्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही अनेक दावे केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

…तर प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड गँग तयार होईल

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
Walmik Karad and Anjali Damania
Anjali Damania : “वाल्मिक कराड ठणठणीत आहेत”, अंजली दमानियांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाल्या…
Anjali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania: धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? अंजली दमानियांनी केले नवे आरोप

“राजकारणाचं गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललंय. सर्वच पक्षांना व्हिनिबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी चुकीचे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात. लोकांना पर्याय नसतो त्यामुळे या लोकांनाच निवडून पाठवावं लागतं. २८८ पैकी ११८ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार असे गुन्हे आहेत. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड गँग तयार होणार आहे. आम्ही ठिय्या आंदोलन न करता नवीन प्रकारचं आंदोलन करणार आहोत”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

हेही वाचा >> संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न ? या मंत्र्यांकडूनच संशय व्यक्त

त्या पुढे म्हणाल्या, मी गणपतीची शपथ घेऊन सांगते धनंजय मुंडेंचं एकट्याचं राकरण संपवण्यासाठी हे आंदोलन नाही. एकत्रित सर्वांविरोधात लढणं शक्य नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवणं गरजेचं आहे. मी जेव्हा खडेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं तेव्हा म्हणाले की तुम्ही माळी समाजाविरोधात आंदोलन करत आहा. त्यामुळे असं बोलणं बंद करा. मी जे बोलते ते खरं आहे की नाही ते सांगा. सगळीकडे मी एकटी पोहोचू शकणार नाही. तिथल्या जनतेनेही आवाज उठवला पाहिजे. माझ्यासारख्या दोनशे तीनशे अंजली जन्माला आल्या तर हा लढा देता येईल”, असं आवाहनही त्यांनी केलं.

Story img Loader