Anjali Damania : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या प्रकृतीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता त्याहीपलिकडे जाऊन त्यांनी वेगळा आरोप केला आहे.
“होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे?”, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. त्या पुढे म्हणाल्या, “मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. यांची चौकशी व्हायला हवी.”
होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 26, 2025
मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत.
ह्याची चौकशी व्हायला हवी.
त्यांच्याच खाली
१. संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले
२. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले.… pic.twitter.com/QoMm3QGK5o
“त्यांनीच संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन केले. वाल्मिक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे”, असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय.
“सर्व गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जामीन. आता त्यासाठी मेडिकल ग्राऊंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचं दाखवलंय. त्याला काहीही झालं नाहीय. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना. अशा लोकांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत, त्याचे अहवाल सार्वजनिक करा. ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात हलवण्याची माझी मागणी आहे”, असं काल अंजली दमानिया म्हणाल्या होत्या.