बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याभोवती वादळ फिरत आहेत. वाल्मिक कराडला या प्रकरणी अटक केली असून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातोय. यावरून धनंजय मुंडे चक्रव्युवहात अडकलेले असताना अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर अनेकविध आरोप केले आहे. आता तर त्यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचून दाखवला आहे.

“एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देतं, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो”, असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखोजाखा मांडला आहे.

9 GBS patients found in Sangli district
सांगली जिल्ह्यात ‘जीबीएस’चे ९ रुग्ण आढळले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Indian Migrants in America
Indian Migrants : अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीयांची लष्करी विमानानं ‘घर’वापसी
Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी; पहिल्याच टर्ममध्ये ‘या’ पदावर निवड!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

९२ रुपयांची बॉटल २२० रुपयांना

“नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय, असं म्हणत अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली अन् हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, हे उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

“नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये एक लिटर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरची बॉटल ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत” असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

“बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं. ३४२६ रुपयाला त्यांनी ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले”, असं म्हणत अंजली दमानिया म्हणाल्या, डीबीटी योजनेत ५ लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

“गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या उत्पादनाचं दर ८१७ रुपयाला आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “मी ऑनलाइन उपलब्ध असलेले दर सांगतेय. हे दर रिटेलचे आहेत. पण ही उत्पादने बल्कने घेतली तर २० टक्के अधिक आहेत. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

भगवान गडावर जाऊन नम्रपणे हे पुरावे दाखवणार

“हे सर्व पुरावे मला भगवान गडावर दाखवायचे आहे. नम्रपणे दाखवायचे आहेत. आणि धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी करायची आहे. तसंच, राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी, अशी विनंती करेन”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

बातमी अपडेट होत आहे

Story img Loader