Anjali Damania : अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच ११ शेतकऱ्यांची व्यथाही मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
पंकजा मुंडेंच्या विरोधातल्या फाईल घेऊन माझ्याकडे काही लोक आले होते. तेजस ठक्कर, राजेंद्र घनवट हे दोघं फाईल घेऊन आले होते. मी दिलेल्या फाईलवर मी काम करत नाही असं मी त्यांना सांगितलं. पण मी बीड चा विषय लावून धरला तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका चॅनलच्या डिबेटमध्ये घेतलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी संपर्क माझ्याशी केला. अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमचा छळ झाला आहे आणि तो राजेंद्र घनवट याच माणसाने केला आहे. राजेंद्र घनवट कोण आहेत ते आज मी तुम्हाला सांगते आहे.
राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय
राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल कंपनीबद्दल म्हणजेच जी फ्लाय अॅश महाजेनको कडून घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर विकायची. ज्याबाबत मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीमध्ये संचालक पदावर जे आहेत ते दोनच आहेत एक आहेत राजश्री धनंजय मुंडे दुसरे आहेत राजेंद्र घनवट. अशी माहिती अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत दिली. तिसरा फोटो जगमित्र शुगर नावाची कंपनी आहे त्याच कंपनीत राजेंद्र घनवट संचालक आहेत. या कंपनीत वाल्मिक कराडही होता. पोपटलाल घनवटही या कंपनीत आधी संचालक होते. यांनी काय केलं आहे? माझ्याकडे ११ शेतकऱ्यांचे तपशील आहेत, त्या सगळ्यांना छळलं आहे. एका शेतकऱ्याची २० कोटींची जमीन होती त्याचा व्यवहार ८ लाखांत केला. एकाची एक कोटीची जमीन होती त्याला ४ लाख रुपये दिले. जे जे त्यांच्या विरोधात लढले त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आणि त्यांचा छळ केला.
मीरा सोनावणेंबाबत काय म्हणाल्या अंजली दमानिया?
मीरा सोनावणे यांच्या घरचे व्यक्ती १९९७ मध्ये वारले होते ते २००६ मध्ये जिवंत दाखवून व्यवहार झाला असं दाखवलं. शिवाय त्या जेव्हा त्यांच्या शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरुन अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं. त्यानंतर या चिडल्या होत्या. त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल केला. इतर शेतकऱ्यांच्या विरोधातही असेच गुन्हे दाखल केले. पोपट घनवट यांनी हा छळ केला. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेतल्या जातात. मी आज पोपट घनवट यांना आव्हान आहे मानहानीचे कितीही दावे माझ्या विरोधात करा. तुमच्या विरोधातले सगळी प्रकरणं मला माहीत आहेत. संजय चव्हाण नावाचा तुमचा माणूस कसा तुमच्यासाठी काम करतो हे देखील मला माहीत आहे. मी गृहमंत्र्यांना या संदर्भात ही प्रकरणं पुन्हा चौकशी केली पाहिजेत यासाठी मागणी करणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना आणि अर्थ मंत्र्यांना ही मागणी करणार आहे. मागच्या १० ते १२ वर्षांपासून हे चाललं आहे. मात्र खरंतर २००४ ते २००५ पासून या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. घनवट हे धनंजय मुंडेंचे पार्टनर आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणांची चौकशी झालेली नाही. असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.