Anjali Damania on Walmik Karad Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण आणि खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीवरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोर्टाकडून जामीन मिळवण्याकरता वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल केले गेले असल्याचा विरोधकांचा दावा आहे. तर, आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी आज एक व्हिडिओच जारी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स या समाज माध्यमावरून अंजली दमानिया यांनी आज एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात अंजली दमानिया म्हणत आहेत की, “सर्व गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जामीन. आता त्यासाठी मेडिकल ग्राऊंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचं दाखवलंय. त्याला काहीही झालं नाहीय. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना. अशा लोकांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत, त्याचे अहवाल सार्वजनिक करा. ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात हलवण्याची माझी मागणी आहे.”

वाल्मिक कराडच्या प्रकृतीविषयी डॉक्टर काय म्हणाले होते?

बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉ.एस.बी. राऊत म्हणाले की, “वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत, त्यांना पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून लेखी कळवण्यात आले होते. पोटाचा त्रास असल्याने आपले शल्यचिकित्सकांनी संध्याकाळी जाऊन तपासणी केली. तपासणीअंती गरज वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania shared a news video alleging that walmik karad is fit and fine sgk