Anjali Damania Post Targeting Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. खुद्द संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत वारंवार भूमिका मांडली आहे. याबाबत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं असताना दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीला धनंजय मुंडे मदत करत असल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यासंदर्भात अंजली दमानियांनी आता काही कागदपत्रे एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना आरोपींनी गाडीतून नेलं. यानंतर त्यांच्या सहकाऱ्याने पोलीस स्थानकात याबाबत माहिती देऊनही पोलिसांनी पहिले दोन तास कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केला होता. त्याचबरोबर, हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केल्याचाही आरोप त्यांनी केला.

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
solapur farmer murder
Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले
Photo Of MLA Sanjay Kelkar.
BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,

या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने समोर येत असून तोच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे. खुद्द धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत.

धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

“संतोष देशमुख यांच्या सख्ख्या भावाने म्हणजे धनंजय देशमुख यांनीच याबाबत माहिती दिली आहे. या अशा घाणेरड्या घटनेशी माझा संबंध लावण्यामागे राजकीय हेती आहे. हा विषय सभागृहातही आला आहे. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्‍यांकडून निवेदन केलं जात आहे”, असं धनंजय मुंडे स्पष्टीकरणात म्हणाले होते. तसेच, बीडमध्ये अनेकजण आपल्यासोबत फोटो काढतात, त्यांना नाही म्हणता येत नाही, तो वैयक्तिक जीवनात काय करतो याच्याशी आमचा संबध येत नाही, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी आरोपींसोबतच्या फोटोंबाबत दिलं होतं.

अंजली दमानियांचा धक्कादायक दावा

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत मोठा दावा करणारी काही कागदपत्र २३ डिसेंबर रोजी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहेत. ही कागदपत्रे म्हणजे जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या सातबाऱ्यांमध्येही इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचीही नावं दिसत आहेत.

“धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन! हे घ्या, धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र… जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे मी ऑनलाईन डाऊनलोड केले आहेत. ३५५४ गुंठे जमीन आहे”, असं आपल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

अंजली जमानिया यांनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्या कागदपत्रांची सध्या चर्चा चालू आहे.

Story img Loader