सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राज्य सरकार आणि त्यांचा पक्षावरही नाराज आहेत. २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी कडाडून टीका केली. दरम्यान, राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेल्या छगन भुजबळांपासून त्यांच्या पक्षाने आणि पक्षातील इतर नेत्यांनी अंतर राखलं आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट अंजली दमानिया यांनी एक्सवर केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो. अंजली दमानिया आमच्या पक्षाचे निर्णय घेत नाहीत. अंजली दमानिया अलीकडच्या काळात शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात आहेत, त्यामुळे त्या अशा पोस्ट शेअर करत असतील. छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षात आहेत आणि आम्ही आमच्या पक्षात आहोत.”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर अंजली दमानिया यांनीदेखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच फडणवीस यांना टोला लगावला आहे. दमानिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ज्यांच्या विरुद्ध लढलो, ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी देवेंद्र फडणवीस नाही.

अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, मी डोरीन फर्नांडिस प्रकरणाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळेंच्या संपर्कात होते, त्यांना मी तीनदा भेटले, पण तेही फर्नांडिस कुटुंबाला घेऊन. त्यांनीदेखील राजकारण बाजूला ठेऊन मदत केली त्याबद्दल त्यांचा आदर. त्या खटल्याप्रकरणी मी तुम्हाला (फडणवीस) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटले होते. सगळ्याच राजकारणातल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही लोक असता. आम्ही फक्त लोकांना होईल तेवढी मदत करतो. उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार आणि तुमचं किळसवाणं राजकारण पाहवत नाही म्हणून लढतो.

हे ही वाचा >> “माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणीला माझ्या जातीचं…” सगेसोयऱ्यांवरून जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. बावनकुळे म्हणाले होते, “अंजली दमानिया यांना एवढंच सांगेन की, छगन भुजबळ भाजपाच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः भाजपामध्ये येण्याची कधी इच्छादेखील व्यक्त केली नाही आणि ते कधी भाजपामध्ये येणारही नाहीत. चुकीच्या बातम्या पसरवणं योग्य नाही.”

Story img Loader