सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राज्य सरकार आणि त्यांचा पक्षावरही नाराज आहेत. २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी कडाडून टीका केली. दरम्यान, राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेल्या छगन भुजबळांपासून त्यांच्या पक्षाने आणि पक्षातील इतर नेत्यांनी अंतर राखलं आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट अंजली दमानिया यांनी एक्सवर केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा