Anjali Damania Tweet For Ajit Pawar : मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी जाचक अटी घातल्या आहेत. पालिका प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, यावरून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी यासंदर्भातील दोन ट्विट केले आहेत. आधी त्या म्हणाल्या, “मुंबई महानगर पालिकेत क्लर्कच्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी? तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. झगडावं लगत त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी.”

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
Solapur guardian minister marathi news
सोलापूरसाठी स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळण्याची अपेक्षा
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

हेही वाचा >> मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी अद्याप ‘जैसे थे’, प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय अर्ज करता येत नसल्याने अनेक उमेदवार वंचित

” १० वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? मी खाली काही उदाहरण दिली आहेत ती पाहा, अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत…..हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत. इंग्रजी व मराठी टाइपिंग आले पाहिजे? BMC मध्ये टाइपरायटर आहेत तरी का? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना. प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त असतो, मुंबई – ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. एक तर ही ९ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या तीन अटी रद्द करा. भूषण गगरानी आणि अश्विनी जोशी ह्यांनी कृपया दाखल घ्यावी”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

त्यांचं हे ट्वीट रिट्विट करून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री फक्त दहावी पास चालतात, पण क्लार्कच्या भरतीमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण युवक हवेत?” असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

मुंबई पदासाठी जाचक अटी

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू आहे. या पदभरतीच्या पात्रता अटींवर उमेदवारांनी व विविध कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जाणार आहेत. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. एवढ्या मोठ्या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार अर्ज करीत आहेत. मात्र या पदासाठीच्या पात्रतेच्या अटी जाचक असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र प्रशासनाने या अटी तशाच ठेवल्या आहेत. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीत उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. तसेच पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्ज भरतानाच सादर करावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जात नसल्याची माहिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे यांनी दिली.

Story img Loader