महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. अजित पवारांचे सातत्याने बारामती तालुक्याचे दौरे, विकासकामांचा आढावा, नव्या कामांचं भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम चालू आहेत. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी भाऊ आणि बहिणीत स्पर्धा रंगणार आहे. अजित पवार हे त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष बारामतीत अजित पवारांच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मेहनत घेतील, अशी सध्या तरी शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीवरून भाजपाने अजित पवारांना इशारा दिला आहे.

इंदापूरचे माजी आमदार आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तथा पुणे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी अजित पवार यांना निवडणुकीपूर्वी इशारा दिला आहे. अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही पूर्वी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचे जे उमेदवार जाहीर (इंदापूरमध्ये) होतील त्या उमेदवारासाठी ते आमची मदत करणार असतील, विधानसभेला ते आमची मदत करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचं काम करू.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Sharad Pawa
संतोष देशमुखांच्या मुलांचं शिक्षण ते कुटुंबाचं संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
ajit pawar delhi visits
Ajit Pawar: अजित पवारांसाठी ‘अब दिल्ली दूर नहीं’; फेऱ्या वाढल्या, ‘अंतर’ घटलं!
Priyanka Gandhi Vadra maiden speech in Lok Sabha
Priyanka Gandhi Speech : “राजाला वेषांतर करण्याचा शौक तर आहे, पण…”, प्रियांका गांधींची संसदेतील पहिल्याच भाषणात जोरदार फटकेबाजी

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात मेहनत घेतली होती. अजित पवारांनीच भरणे यांना जिंकवलं असं स्थानिक राजकारणात बोललं जात. आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार असा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापुरात पाटील विरुद्ध पवार संघर्षाला सुरुवात होऊ शकते.

हे ही वाचा >> मराठा आंदोलकांना धक्का? “मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात टिकणार नाही”, माजी सदस्याचा दावा; अध्यक्षांवर आरोप करत म्हणाले…

राजवर्धन पाटील यांनी ठणकावून सांगितलं की, काही लोक इंदापूरच्या जागेवरून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी पुन्हा एका सर्वांना सांगतो की, आम्ही २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढणार आहोत.

Story img Loader