कोल्हापूर : चालू गळीत हंगामासाठी उसाला 3300 रुपये दर मिळावा आणि ऊस आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर – सांगली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे या मार्गावरील वाहतुकीमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता.शिरोळ तालुक्यातील आंदोलनाला काल संघर्षाचे स्वरूप मिळाले. आंदोलन करणाऱ्या अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांना साखर कारखानदार समर्थकांनी मारहाण केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामध्ये संघटनेचे तालुकाप्रमुख दीपक पाटील जखमी झाल्याने आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर सांगली महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर केला होता.त्यानुसार सकाळी कार्यकर्ते अंकली जुना टोल नाका येथे जमले. त्यांनी उसाला दर मिळण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे रत्नागिरी – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush organization block the kolhapur sangli highway beating sugarcane protestors kolhapur tmb 01