लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना विनयभंग प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा जामीन फेटाळण्यात आला व त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत ही विनयभंगाची तक्रार आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दलालांनी केली असल्याचा कांगावा कदम यांनी केला. या महामंडळात दलालांनी १८० कोटी रुपये हडपल्याचेही त्यांनी पत्रकारांना आवर्जून सांगितले. महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने अटकेच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. तसेच त्यांच्या सर्मथकांची मोठी गर्दी होती.
अण्णा भाऊ साठे महामंडळातील कर्ज वितरणात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या १७८ पकी १०० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये बनावट जात प्रमाणपत्र लावण्यात आले, तर काही प्रकरणांत लाभार्थ्यांची रक्कम दलालांनीच उचलल्याचे उघडकीस आले. त्यानंतर एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कर्ज वितरणातील हा घोटाळा बाहेर काढल्यानेच विनयभंगाची खोटी तक्रार करून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा आरोप कदम यांनी केला.
सकाळी सुभेदारी विश्रामगृहावर कदम यांनी समर्थकांची जमवाजमव करून ठेवली होती. त्यांच्या विरोधात सुवर्णा उमाप यांनी न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाच्या आदेशानुसार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, की अनुसूचित जातीतील व्यक्तींना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, या साठी बीजभांडवल म्हणून लाभार्थ्यांला प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तसेच केंद्राच्या योजनेतूनही कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादसह राज्यातील दहा जिल्ह्यांत या योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या दलालांची टोळीच असल्याचे उघडकीस आले. काही प्रकरणांतील दलालीची कागदपत्रे दाखवत कशा प्रकारे गरव्यवहार झाला, याची माहितीही कदम यांनी पत्रकार बठकीत दिली.
महामंडळामार्फत शोभा गोपीनाथ शिरसाट यांना एक लाख रुपये कर्ज दिले होते. त्यांची मंजूर झालेली रक्कम बँकेतून रवी मिसाळ नावाच्या दलालाने उचलली. औरंगाबाद, लातूर, बीड, अकोला, िहगोली, जालना यांसह १० जिल्ह्यांमध्ये कर्ज वितरणानंतर रक्कम हडप करणाऱ्यांचे टोळकेच कार्यरत असल्याचे दिसून आल्याचा आरोप अध्यक्ष कदम यांनी केला. हा गरव्यवहार करणाऱ्यांमध्ये काही महिला दलाल आहेत. यातील अरुणा मिसाळ व सुवर्णा साबळे यांनी विनयभंग केल्याची खोटी फिर्याद दिली. न्यायालयाच्या आदेशाने ३५४ ब कलमान्वये कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, ही तक्रार खोटी आहे. या प्रकरणात दलाल असणाऱ्या संजय ठोकळसह दोन महिलांचा समावेश असल्याचा आरोप मंगळवारी कदम यांनी पत्रकार बठकीत केला.
अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना अटक
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना विनयभंग प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा जामीन फेटाळण्यात आला व त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत ही विनयभंगाची तक्रार आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दलालांनी केली असल्याचा कांगावा कदम यांनी केला.
आणखी वाचा
First published on: 19-06-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna bhau sathe corporation president arrested