दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा जाहीर सभा घेतल्यानंतरही तिथे अरविंद केजरीवाल निवडून येतात, हा मोदींचा पराभव असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना केला. दिल्लीतील एकहाती विजयाबद्दल त्यांनी केजरीवाल यांना शुभेच्छाही दिल्या.
हजारे म्हणाले, मोदींनी विश्वासार्हता गमावली आहे. सरकारचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही आणि पारदर्शकताही नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. प्रत्येक व्यक्तीच्या बॅंक खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. पण हे आश्वासन त्यांनी पाळले नाही.
केजरीवाल यांनी साधेपणाने सरकार चालवावे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा