राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य केलं आहे. ‘या माणसानं देशाचे वाटोळं केलं’, अशी पोस्ट एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवर जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. याविरोधात आता अण्णा हजारे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. वकिलाचा सल्ला घेऊन आव्हाडांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो एक्स ( ट्वीटवर ) अकाउंटवर शेअर केला होता. त्यावर आव्हाड यांनी लिहिलं होतं की, “या माणसानं देशाचं वाटोळ केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.”

यावर प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले, “माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं, असं म्हणायचं. पण, मी केलेल्या कायद्यामुळे जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. माझ्या आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं, हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले. कदाचित ते त्यांना सहन होत नाही.”

हेही वाचा : “तू कोण आहे, तुला कशाला…”, एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

“त्यामुळे काहीतरी कुरापती करायच्या, बदनामी करायची. मात्र, काही फरक पडत नाही. वकिलाचा सल्ला घेऊन ‘वाटोळं केलं’ म्हणणाऱ्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकणार,” असा इशारा अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला.

हेही वाचा : फडणवीसांच्या शुभेच्छा, राष्ट्रवादीच्या धर्मराव आत्राम यांनाही विश्वास; अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेला नवे धुमारे

दरम्यान, अण्णा हजारेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ‘एक्स’ अकाउंटवर पुन्हा पोस्ट केली. “माझ्या ट्विटनंतर यांना जाग आली. मला न्यायालयात खेचतो, असं पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्यापासून जागे राहतात का?” असा खोचक टोला आव्हाडांनी अण्णा हजारेंना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare filed defamation case jitendra awhad over tweeter post ssa
Show comments