सुधारित लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर बुधवारी आपण उपोषण सोडू, असेही त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये स्पष्ट केले.
राज्यसभेत सुधारित लोकपाल विधेयक मंजूर झाल्याचे समजताच राळेगणमध्ये जल्लोष करण्यात आला. अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी तिरंगा ध्वज उंचावून आणि टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. अण्णा हजारे यांनीही हे विधेयक मंजूर केल्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे आभार मानले. लोकपाल कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर देशातील भ्रष्टाचार निश्चितपणे कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader