सक्षम जनलोकपाल विधेयकावर जनजागृतीसाठीच्या बहुचर्चित देशव्यापी दौऱ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सायंकाळी राळेगणसिद्घी येथून रवाना झाले. परवा (दि. ३०) ला पाटणा, बिहार येथील सभेने या दौऱ्यास प्रारंभ होणार आहे. दरम्यान हजारे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हजारे यांनी पत्र पाठवून आगामी अर्थसंकल्पीय अधीवेशनात लोकपाल विधेयक संमत होईल असे म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या जयपूर येथील अधिवेशनात सोनिया गांधी यांनी सत्ता विषासमान असून जनलोकपाल विधेयकास मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यावर हजारे यांनी गांधी यांना पत्र पाठवून सत्ता विषासमान असेल तर राजकीय पक्षांची स्पर्धा कशासाठी असा सवाल करून सत्ता ही नशा असल्याचे आपल्या पत्रात म्हटले होते. लोकपाल विधेयक मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी या विधेयकात केंद्रीय गुप्तचर विभाग, केंद्रीय दक्षता आयोगाला स्वायत्तता दिली काय असा सवालही करण्यात आला होता.या विधेयकासाठी ५ एप्रिल २०११  रोजी दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या दबावामुळे कॉंग्रेसने पाच केंद्रीय मंत्री व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त मसुदा समिती स्थापन केली होती. त्यासंबंधात राजपत्रही प्रसिद्घ करण्यात आले. समितीच्या तीन बैठका झाल्या. परंतु समितीचा काय निर्णय झाला याची जनतेला माहिती मिळाली नाही. याचाच अर्थ सत्तेचे विकेंद्रीकरण होत नसल्याचे स्पष्ट होते. जोपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा बसणार नसल्याचे हजारे यांनी गांधी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.  अण्णांच्या पत्रास सोनिया गांधी यांनी उत्तर दिले असून हे पत्र राळेगणसिद्घी कार्यालयास शनिवारी फॅक्सदवारे प्राप्त झाल्याचे कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी सायंकाळी हजारे मोटारीने पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात फिरोदिया होस्टेल येथे मुक्काम करून सकाळी साडेसातला विमानाने दिल्लीस व तेथून दुपारी ते पाटण्यास रवाना होणार असल्याचे दत्ता आवारी यांनी सांगितले. पाटणा येथे दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत ही सभा होणार असून या सभेसाठी माजी लष्करप्रमुख व्हीक़े.सिंग, माजी सनदी अधिकारी किरण बेदी यांच्यासह मध्यवर्ती समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा