भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून समर्थन करणाऱ्या किरण बेदी यांच्या भूमिकेवर बोलण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोयीस्करपणे टाळले. बेदी काय बोलल्या हे मला माहीत नाही असे ते म्हणाले. ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांनी आम आदमी पार्टीसोबत जाण्याचे सुतोवाच केल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, लोकशाही आहे. कोणी कोठेही जाऊ शकतो, ज्यांना जायचे असेल ते जातील, राहायचे असेल ते राहतील असेही ते म्हणाले.
देशाला स्थिर उत्तरदायी व सक्षम सरकारची गरज आहे, असे सरकार सध्यातरी नरेंद्र मोदीच देऊ शकतात. पंतप्रधानपदासाठी माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. माझे मतही मोदींनाच जाईल, असे मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केले होते.
अण्णा हजारे यांचे कानावर हात
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून समर्थन करणाऱ्या किरण बेदी यांच्या भूमिकेवर बोलण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोयीस्करपणे टाळले.
First published on: 11-01-2014 at 01:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare says no comment on kiran bedi vote for modi stand