भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून समर्थन करणाऱ्या किरण बेदी यांच्या भूमिकेवर बोलण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोयीस्करपणे टाळले. बेदी काय बोलल्या हे मला माहीत नाही असे ते म्हणाले. ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांनी आम आदमी पार्टीसोबत जाण्याचे सुतोवाच केल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, लोकशाही आहे. कोणी कोठेही जाऊ शकतो, ज्यांना जायचे असेल ते जातील, राहायचे असेल ते राहतील असेही ते म्हणाले.
देशाला स्थिर उत्तरदायी व सक्षम सरकारची गरज आहे, असे सरकार सध्यातरी नरेंद्र मोदीच देऊ शकतात. पंतप्रधानपदासाठी माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. माझे मतही मोदींनाच जाईल, असे मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in