तृणमूल काँग्रेसवरील ममता कमी झाल्यावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षाच्या तिकीटावर उत्तर-पूर्व मुंबई मतदार संघातून निवडणुकीच्या रींगणात उतरलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना पाठींबा दर्शविला आहे. अण्णा हजारे यांनी त्यांच्या पातळीवर लोकसभा निवडणुकीत या तिघांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारी संध्याकाळी एका प्रसिध्दीपत्रकातून हजारे यांनी या तिघांना त्यांचा पाठींबा असल्याचे जाहीर केले. या तिघांच्या सामाजिक कार्याचा फायदा समाजाला होईल. त्यासाठी या तिघांना त्यांचे मतदार निवडून देतील अशी आशा अण्णा हजारे यांनी या प्रसिध्दीपत्रकामध्ये व्यक्त केली आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare to support medha patkar raju shetty