गोपीनाथ मुंडे देशाचे ग्रामविकासमंत्री झाल्यानंतर देशाच्या ग्रामविकासाला चांगली चालना मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु मुंडे यांच्या अपघाती निधनाने हे स्वप्न अधुरे राहिल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
मुंडे यांनी राज्यातील तसेच देशातील जनतेची जी सेवा केली, ती अतुलनीय आहे. नुकताच शपथविधी होऊन देशाचे ग्रामविकासमंत्री म्हणून त्यांनी हाती सूत्रे घेतली होती. मुंडे यांच्याकडे हे खाते आल्याने देशाच्या ग्रामविकासाला चांगली चालना मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु काळाने मध्येच घाला घातल्याने हे स्वप्न अधुरे राहिले आहे. मुंडे यांच्या निधनामुळे राज्याची तसेच देशाची न भरून निघणारी हानी झाली आहे. मुंडे यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता हरपला असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना हजारे यांनी केली.