खासदार डॉ. पद्मसिंह पाटील पराभूत झाल्यास गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘डॉक्टर हरल्यास तुझा पवनराजे करू,’ अशा धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठविण्यात आले आहे. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. पाटील यांचे मेव्हणे जीवन गोरे यांच्या जुन्या लेटरहेडचा वापर करून ही धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे पुन्हा खळबळ उडाली.
डॉ. पाटील पराभूत झाल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी लोहारा तालुक्यातील पांढरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांस अटक केली होती. या प्रकरणाचा छडा अजून लागला नाही, तोच हजारेंना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. ‘डॉक्टर हरल्यास तुझा पवनराजे करू,’ असे या धमकीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष गोरे यांच्या जुन्या लेटरहेडचा या धमकीसाठी वापर केला आहे. गोरे हे जि. प.चे अध्यक्ष असतानाचे हे लेटरहेड आहे. या प्रकरणी हजारे यांचे स्वीय सहायक श्याम पठारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली.
‘पद्मसिंह पाटील हरल्यास तुमचा पवनराजे करू’
खासदार डॉ. पद्मसिंह पाटील पराभूत झाल्यास गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘डॉक्टर हरल्यास तुझा पवनराजे करू,’
आणखी वाचा
First published on: 04-05-2014 at 05:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazares office gets threat calls