सांगली : रहदारीस अडथळा ठरणारी मारूती रोडवरील १३ दुकानांच्या समोरील अतिक्रमण गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने हटवले. शहरातील रहदारीचे रस्ते तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश आज आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिले आहेत. यानुसार ही कारवाई करण्यात आली.

महापालिका प्रभाग समिती एकमधील मारूती रस्ता, कापड पेठ, भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी, मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमण करण्यात आल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही आज सुरू करण्यात आली. सहा. आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील १३ दुकानांसमोरील पत्रे, कापडी शेड, तीन हातगाडी, तोडण्यात आल्या. रस्त्यावरील साहित्य हटविण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी दिली. ही मोहीम उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे आणि कर्मचारी यांनी राबवली.

Story img Loader