देवळाली कॅम्प येथील कोटय़वधी रुपयांच्या जमीन व्यवहारासंदर्भात येथील भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयाने प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. देवळाली कॅम्प येथील जमीन खरेदीचे हे प्रकरण मागील काही वर्षांपासून गाजत आहे. न्यायालयीन वाद प्रलंबित असताना वाडकर यांनी भागीदाराला विश्वासात न घेता मूळ मालकाकडून परस्पर जमिनीचा व्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anticipatory bail to suresh wadkar