लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा अद्याप खाली बसतोय न बसतोय तोपर्यंत आम आदमी पार्टीने रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा देत पुन्हा एकदा रणिशग फुंकले आहे. नगरपालिकेने दोन दिवसांची मुदत दिली असून दोन दिवसात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यातल्या नागरी समस्यांची मोठय़ा प्रमाणात उजळणी झाली होती. सात दिवस, चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा नगरपालिकेतील मनोमिलनाच्या नगराध्यक्षांनी दिली होती. आमदार आणि खासदार फंडातून यासाठी पसेही देण्यात आले. पाण्याच्या टाक्यांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. मात्र, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांची सुरु झालेली खोदाई अद्याप बंद न झाल्याने नागरिक त्रासले आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी खणलेल्या चरांमध्ये मोठी खडी टाकून ठेवली आहे. तीन आठवडय़ाहून अधिक काळ झाला तरी त्यावर डांबरीकरण झालेले नाही. या खडीमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. निवडणूक आणि आचारसंहिता याची कारणे सांगून ही कामे तशीच राहिली होती. अखेरीस आम आदमी पक्षाने याबाबत आवाज उठवत आंदोलनाचा पवित्रा घेतला. खालच्या रस्त्यावर उकरलेल्या पाईपलाईनच्या जागेवरच नगरपालिकेचे अभियंता चिद्रे यांना बोलावण्यात आले. त्यापूर्वी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही काम कधी पूर्ण करणार हे विचारण्यासाठी दूरध्वनी केले होते. चिद्रे यांच्याशी आम आदमी पक्षाच्या सचिन भोगावकर तसेच कार्यकर्त्यांनी बोलणी केली. त्यात रस्त्याची कामे दोन दिवसांत सुरु होतील आणि ती लवकरात लवकर पूर्ण करु, असे आश्वासन चिद्रे यांनी दिले. मात्र, पक्षाचे कार्यकत्रे या आश्वासनावर समाधानी नव्हते. दोन दिवसात काम न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी हरिदास साळुंखे, शिवम चांदणे, विश्वनाथ फरांदे, किशोर महामुलकर, श्रीकांत फल्ले, राजेंद्र सुतार, रिवद्र मतकर, संतोष पवार, सोमनथा साठे आदी कार्यकत्रे उपस्थित होते.
एकीकडे शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण होत असताना महत्त्वाच्या आणि अत्यंत रहदारी असणा-या खालच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
साता-यात रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी ‘आम आदमी’चा आंदोलनाचा इशारा
लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा अद्याप खाली बसतोय न बसतोय तोपर्यंत आम आदमी पार्टीने रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा देत पुन्हा एकदा रणिशग फुंकले आहे.
First published on: 22-04-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: App warning of agitation demand for repair of roads