रोहित पवार कसे ही करून सत्तेत सहभागी व्हा असे बॅनर कर्जत तालुक्यात झळकले. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे आमदार रोहित पवार यांनी कसेही करून सत्तेत सहभागी व्हा आणि कर्जत जामखेडला न्याय द्या आम्ही मतदार असे आशय असलेले फलक कर्जत तालुक्यात आज लागला आहे. यामुळे मतदार संघात खळबळ उडाली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता येईल आणि रोहित पवार यांना मंत्री पदाची संधी हमखास मिळेल असे वाटत होते. कर्जत येथील विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचार सांगता सभेत तसे जाहीर केले होते.मात्र, राज्यात महायुती मोठे यश मिळवत सत्ता काबीज केली.यामुळे मतदारसंघात रोहित पवार यांच्या समर्थकांत आणि मतदारांमध्ये काहीशी निराशा निर्माण झाली आहे.
विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र येणार अशी जोरदार चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली होती. तसे संकेत अहील्यानगर जिल्ह्यातील खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिले होते. यामुळे राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्यात उशीर होत असल्याचे देखील जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र हे सर्व केवळ चर्चाच होती असे दिसून आले. असे असताना आज पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील रोहित पवार तुम्ही मतदार संघातील जनतेसाठी कसे ही करून सत्तेत सहभागी व्हा या फलकाचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे मोठी खळबळ मतदार संघात उडाली आहे.