अलिबाग – उर्दू शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्याची बाब रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात समोर आली आहे. तालुक्यात उर्दू शिक्षकांची ३६ पदं रिक्त आहेत. त्यामुळे ९ तालुक्यांतील शाळा अशा आहेत ज्या ठिकाणी एकही उर्दू शिक्षक कार्यरत नाही. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शाळांवर उर्दू शिक्षक नसल्याने या शाळामंधील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.

रायगड जिल्हा परिषदेने मुस्लीम समाजातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी उर्दू शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद या शाळांना मिळाला, पण सध्या या शाळांमध्ये उर्दू शिक्षकांआभावी शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी श्रीवर्धन तालुक्यातील ९ शाळांमध्ये एकही उर्दू शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यात कोलमांडला, बागमांडला, सायगाव, गाळसुरे, रानवली, हरवीत, दिघी, सर्वे, कारला या उर्दू माध्यम शाळांचा समावेश आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – रायगड : रोहा शस्त्रसाठा आणि वन्यजीव शिकार प्रकरण; आणखी एक आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धक्कादायक बाब म्हणजे उर्दू शिक्षक उपलब्ध नसल्याने चक्क मराठी शिक्षकांची शाळांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यंतरी शिक्षक उपलब्ध नसल्याने रायगड जिल्हा परिषदेने १६५ निवृत्त शिक्षकांची शाळांवर कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती केली होती. पण यातही उर्दू शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे या शाळांना उर्दू शिक्षक मिळू शकलेले नाहीत. श्रीवर्धन तालुक्यात उर्दू शिक्षकांची ५४ पदं मंजूर आहेत. यापैकी केवळ १८ पदं भरलेली आहेत. तर ३६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उर्दू शाळांच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे या शाळांवर तातडीने उर्दू शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून या शाळांवर उर्दू शिक्षकांची नेमणूक करा यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. पण उर्दू शिक्षक उपलब्ध नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. उर्दू शाळांवर मराठी शिक्षकांची नेमणूक करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा प्रकार थांबायला हवा. नियमित भरती होत नसेल तर शिक्षण विभागाने कंत्राटी उर्दू शिक्षक शाळांवर नेमावेत. – एझाज हवालदार, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा – PM Narendra Modi in Maharashtra : नाशिकमध्ये शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, पोलिसांचा कडक बंदोबस्त

उर्दू शिक्षकांची रिक्त पदे भरली जावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तालुक्याला उर्दू शिक्षक मिळतील अशी अपेक्षा आहे. तोवर प्रत्येक शाळेवर किमान एक शिक्षक असावा असे नियोजन केले आहे. – नवनाथ साबळे, गट शिक्षण अधिकारी, श्रीवर्धन

Story img Loader