छत्रपती संभाजीनगर – मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना निघाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांना दिली.

या अधिसूचनेनुसार ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे येत होती. याच प्रमुख एका मागणीसाठी मंगळवारपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲड. निकम यांच्या नियुक्तीच्या संदर्भाने अधिसूचना निघाली आहे.

Story img Loader