सांगली : कवलापूर येथे विमानतळ उभारणीला बुधवारी राज्य शासनाने तत्वतः मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत आ.सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर यांच्यासह औद्योगिक विकास महामंउळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

. या बैठकीमध्ये कवलापूर येथे विमानतळ होण्याकरता तत्वतः मंजुरी दिली असून लागणार्‍या भूसंपादनाच्या जमिनीबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. आ. गाडगीळ यांनी कवलापूर विमानतळाची सांगली जिल्ह्यासाठी असलेली गरज या बैठकीत मांडली. सांगलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी पूरक उद्योगांच्या विकासासाठी कवलापूर येथे विमानतळ होणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. औद्योगिक विकास महामंडळाकडे असणारी जमीन विमानतळ विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून यापुढील सर्व कारवाई विमानतळ विभागाचे अधिकारी पूर्ण करणार आहेत असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.