सांगली : नागरी वस्तीजवळ सहजासहजी दृष्टीस न पडणारा तिरंदाज पक्षी मिरजेत आढळला. ॲनिमल राहत व डब्ल्यूआरआरसी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून वन विभागाच्या मदतीने वैद्यकीय उपचार करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

मिरजेतील समीर शहा व साहिल शहा यांच्या अंगणातील झाडावरून एक पक्षी खाली पडला व जवळ गेले असता बदकासारखा तुरुतुरू पळू लागला. कुत्रे, मांजर त्याच्यावर हल्ला करतील या काळजीने त्यांनी त्यास पकडून त्यांच्या घरात सुरक्षित ठेवले. यानंतर ॲनिमल राहत व डब्ल्यूआरआरसी या संस्थेत फोन करून पक्षाविषयी माहिती दिली.

shambhuraj desai replied to uddhav thackera
“मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pankaja Munde
Pankaja Munde : “तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले”, पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य; रोख कोणाकडे?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा >>>“मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

सदर पक्षी येथे सहसा न आढळणारा असून त्यास तिरंदाज, सर्पमान्या अशा नावाने ओळखले जाते. वनविभागाचे सचिन साळुंखे व ॲनिमल राहतचे किरण नाईक तिथे तत्काळ पोहोचले व पक्षी ताब्यात घेऊन मिरज पशुवैद्यकाकडे नेले. त्याची तपासणी केल्यानंतर तो पक्षी जखमी व आजारी नसून त्यास खाणे न मिळाल्यामुळे अशक्त झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर त्यास वनविभागाच्या उपचार केंद्रात ठेवण्यात आले. या केंद्रात त्याला दोन दिवस मासे खाण्यास देण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सोनवडेकर तसेच राहतचे डॉक्टर राकेश चितोरा, डॉ. सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात आले.