छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.

ornaments offered to Tuljabhavani Devi
छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात का घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट?

हेही वाचा – पिंपरी : गिर्यारोहण या साहसी खेळाकडे दुर्लक्ष, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारने…”

यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपूर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.