आई-वडील विभक्त झाल्याचं सांगत प्रशिक्षाणीर्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारला आता पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीवरच संशय आला आहे. त्यामुळे पालकांची वैवाहिक स्थिती तपासण्यासाठी शहर पोलीस चौकशी करत असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नागरी सेवा परीक्षेत पूजा खेडकर यांनी त्यांची खोटी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. २०२३ बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या खेडकरांनी जात प्रमाणपत्र आणि अपंग प्रमाणपत्र दाखवून यंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. अखेर त्यांचं प्रशिक्षण थांबवून त्यांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये परत बोलावण्यात आले आहे.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 news in marathi
निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा; वाचा कुठे घडला हा प्रकार?

हेही वाचा >> शेती ते ऑटो, पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध! अनेक धक्कादायक खुलासे समोर

पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती देताना पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तपास सुरू केला आहे.”

मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाल्या होत्या पूजा खेडकर?

एका खासगी इन्स्टिट्युटच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये पूजा खेडकर म्हणाल्या होत्या की त्यांचे आई-वडिल विभक्त झाले असून त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न शून्य आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचे वडील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर येथून उभे होते. त्यात त्यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधात पूजा खेडकर यांनी दावा केला आह. निवडणूक घोषणापत्रात हे दोघेही अद्याप एकत्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, पूजा खेडकरांनी पालक विभक्त झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे.

हेही वाचा >> Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”

मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, जून २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर, वडील दिलीप खेडकर यांना अंतरिम जामीन मिळाला असून त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

दिलीप खेडकर यांच्या नावे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही बेहिशेबी संपत्तीची तक्रार आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) उमेदवार म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवताना त्यांनी ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आणि ४९ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न जाहीर केले होते. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अहमदनगर युनिटकडून त्यांच्या संपत्तीचा अहवाल मागवला आहे.