वाई: प्रतापगडाच्या पायथ्याला असलेले अतिक्रमण हटवले गेले आहे. त्याच जागेत अफझल खानाच्या वधाचे भव्य शिल्प उभे करुन ते शिल्प सामान्य जनतेला पाहण्यासाठी खुले करावे. त्या परिसराला शिवप्रताप भूमी असे नाव देण्यात यावे, अशी मागणी श्री. शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आणखी वाचा-“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास झाले आहेत कारण…”, सुषमा अंधारेंची बोचरी टीका
राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी वनखात्याच्या जागेवर केलेले बेकायदेशीर बांधकामाचे अतिक्रमण हटवण्याचा धाडसी काम केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात.