शहरातील पुणे रस्त्यावरील बाळे येथे दोन घरांवर सहा चोरटय़ांनी सशस्त्र दरोडा घालून घरातील मंडळींवर तलवारींनी हल्ला करीत सुमारे ७८ हजारांचा ऐवज लुटून नेला. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या दरोडय़ाची नोंद झाली आहे.
बाळे येथील शिवाजी नगरात राहणारे संदीप अनिल वेदपाठक हे कुटुंबीयांसह आपल्या घरी झोपले असताना पहाटे दोनच्या सुमारास दोन चोरटय़ांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा आवाजाने झोपेतून जागे झालेल्या संदीप वेदपाठक यांनी चोरटय़ांनी पाहिले व घाबरून ते गच्चीवर जाऊन आरडाओरड करू लागले. परंतु बाजूच्या गच्चीवर दडून बसलेले आणखी दोन चोरटे त्यांच्या गच्चीवर आले. त्यांनी संदीप वेदपाठक यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व तलवारींनी हल्ला केला. नंतर आणखी दोन चोरटे येऊन मिळाले. या सर्वानी घरात घुसून वेदपाठक यांच्या वृध्द आई-वडिलांच्या ताब्यात असलेल्या कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच मनगटी घडय़ाळ,मोबाइल संच असा सुमारे ७८ हजारांचा ऐवज लुटून नेला.
वेदपाठक यांच्या घरावर दरोडा घातल्यानंतर चोरटय़ांनी शेजारच्या कंठीकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. चोरटय़ांनी कंठीकर कुटुंबीयांना मारहाण करीत दहशत निर्माण केली व नंतर त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज बळजबरीने लुटून नेला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती फौजदार चावडी पोलिसांना कळविली असता पोलिसांनी गुन्ह्य़ाच्या ठिकाणी धाव घेतली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात
महिलेचे मंगळसूत्र पळविले
शेअर रिक्षातून प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधील ७५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरटय़ांनी पळविले. शहरात शिवछत्रपती रंगभवन ते पांजरापोळ चौकातील एसटी बस स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. शिवाजी पिराजी सोलनकर (रा. हंजगी,ता.अक्कलकोट) हे आपल्या कन्येसह सोलापुरात शेअर रिक्षात बसून एसटी बसस्थानकाकडे निघाले होते. तेव्हा प्रवासात अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या मुलीच्या ताब्यातील पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र अलगद काढून घेतले. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

Story img Loader