मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील महादेव बाजीराव पाटील (वय २४) या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्याचे पाíथवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महादेव पाटील हा जवान जम्मू-काश्मीरमध्ये नागपाडा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोक्यात गोळी लागून गंभीर जखमी झाला होता. सोमवारी रात्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांना लष्करी विभागातून सोमवारी रात्रीच झालेल्या दुर्घटनेची थोडक्यात दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. या घटनेमुळे खंडेराजुरी गावात शोककळा पसरली असून शहीद जवानाच्या अंत्यविधीसाठी तयारी करण्यात येत असल्याचे सरपंच बापू माणगावकर यांनी सांगितले.
आणखी वाचा