सागरी महामार्गावरील महाराष्ट्र व गोवा राज्य जोडणारे आरोंद्रा किरणपाणी पुलाच्या गोवा राज्यातील कामे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात येईल, असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.
आरोंद्रामार्गे गोवा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होत असतानाच गोवा राज्याच्या बाजूने चर काढण्यात आल्याने पूल वाहतुकीस खुला होण्यास अडथळा निर्माण झाला होता.
या संदर्भात सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, बांधकाममंत्री सुदन ढवळीकर, ग्रामविकासमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन गोवा व महाराष्ट्र राज्यांच्या बांधकामांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक गोवा मुख्यमंत्र्यांनी दालनात आयोजित केली होती.
येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासंदर्भात गोवा राज्यातील साइड पट्टीची कामे पूर्ण करण्यात येऊन हलकी वाहने किरणपाणी पुलावरून सोडण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री ना. पर्रिकर यांनी देऊन कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
गोवा राज्यात केरी शिवोली असा नवीन बायपास रस्ता प्रस्तावित आहे, तो रस्ता सिंधुदुर्ग वेंगुर्ले चिपी विमानतळ ते शिवोली असा बीओटी तत्त्वावर व्हावा असे मात्र दीपक केसरकर यांनी सुचविले.
दोन्ही राज्याचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेण्याचा विचार करण्याचे ठरले.
गोवा राज्यात टोल आकारण्यात येणार आहे. त्यातून सिंधुदुर्ग वगळावा किंवा सामान्य कर आकारून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्य़ात संधी द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा