पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली गेली पाहिजे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरु झाली आहे.
रावण दहनाला माझा आधीपासूनच विरोध
रावण दहनाला माझा सुरुवातीपासून विरोध आहे. आज काही नवीन नाही. आज आनंदाचा दिवस आहे मी कुठलंही वाईट स्टेटमेंट देणार नाही. आजचा दिवस आनंदाने साजरा झाला पाहिजे. जे काही बोलायचं ते उद्या बोलू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आणखी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“मोहन भागवत जी काही शस्त्र पूजा करतात ती फक्त या देशाच्या काही जवानांना मिळत असतात. इतरांना नाही. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांना आर्म अॅक्ट खाली अटक झाली पाहिजे” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलं. तसंच आम्ही याआधीही ही मागणी केली आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. नागपूरमध्ये मोहन भागवत यांनी जी शस्त्रपूजा केली त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.