जन्मदाखला काढून देण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीस चांदवड येथे तर शेतीची विनाशेती नोंद करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगर रचना कार्यालयातील कनिष्ठ आरेखकास धुळे येथे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
तक्रारदाराने त्यांच्या आजोबाच्या जन्म नोंदीचा उतारा मिळण्यासाठी चांदवड तहसील कार्यालयात अर्ज केला होता. खडकजांब ओझर येथील बबनराव आनंदा भदाणे या खासगी व्यक्तीने तक्रारदारास तहसील कार्यालयातून उतारा मिळवून देण्यासाठी १५०० रुपयांची मागणी केली. मंगळवारी ही रक्कम चांदवड तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भदाणे यास अटक केली. दुसऱ्या घटनेत तक्रारदाराने शेतीची अनपीक (एन ए) अशी नोंद करून अंतिम ले-आऊट मंजुरीसाठी धुळे नगररचना कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी तक्रारदाराचा स्वीय साहाय्यक विजय ऊर्फ बाबा गायकवाड यांच्याकडे आरेखक प्रवीण श्रीराम खंडेराव याने ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम मंगळवारी सायंकाळी ५.०० वाजता स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा