सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

खासगी सावकार शैलेश धुमाळ, खासगी सावकार आशु धुमाळ, डॉक्टर तात्यासाहेब चौगुले, पोलीस पाटील महादेव सकपाळ, शिक्षक अनिल बोराटे, नंदकुमार रामचंद्र धुमाळ, रेखा तात्यासो चौगुले, खंडेराव केदारराव शिंदे, राजू लक्ष्मण बंने, अनाजी कोंडीबा खरात, अनिल लक्ष्मण बने, शामगोंडा कामगोंडा पाटील, शिवाजी कोरे, नंदकुमार रामचंद्र पवार, सतीश सखाराम शिंदे, शिवाजी नामदेव खोत, गणेश ज्ञानू बामणे, सुभद्रा मनोहर कांबळे, प्रकाश पवार ( सर्व रा बेडग), विजय विष्णू सुतार, राजेश गणपती होटकर, पांडुरंग श्रीपती घोरपडे, अण्णासो तातोबा पाटील, नरेंद्र हणमंतराव शिंदे, अनिल बाबु बोराडे, संजय इराप्पा बागडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

खाजगी सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ, डॉ. तात्यासाहेब आप्पांणा चौगुले, नंदकुमार रामचंद्र पवार, राजेंद्र लक्ष्मण बंने, अनिल लक्ष्मण बंने, खंडेराव केदारराव शिंदे, प्रकाश कृष्णा पवार, संजय इराप्पा बागडी, अनिल बाळू बोराडे, पांडुरंग श्रीपती घोरपडे, शिवाजी लक्ष्मण कोरे, सौ. रेखा तात्यासो कोरे या १३ खाजगी सावकारांना केली अटक.

Story img Loader