अलिबाग – तीन दिवसांपूर्वी घरोघरी गणेशाचे आगमन झाले होते. त्यानंतर आज शनिवारी तीन दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईंचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी सायंकाळी मुली आणि महिला गौरी आणण्यासाठी गेल्या. कोकणात तेरडयाच्या गौरी आणल्या जातात. परंपरेनुसार माळरानावर किंवा पाणवठय़ावरून तेरडयाच्या रोपाचे पूजन करून गौरी वाजत गाजत तसेच पारंपरिक गाणी म्हणत घरोघरी आणण्यात आल्या. त्यानंतर गौरी सजवण्यात आल्या. वस्त्रालंकारांचा साजष्टद्धr(२२४)ृंगार चढवण्यात आला. भेंडीच्या फुलांनी पूजा करण्यात आली. महिलांनी गौराईची सामूहिक आरती केली. तिला आवडता भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री जेवणानंतर गौरीचे स्तवन झाले. महिलांची नाचगाणी फुगडया आदी खेळांना रंगत आली. यंदा गौराईचे आगमन पूर्वा नक्षत्रावर होत असल्याने नवविवाहितांचे ओवसे आहेत. गौरींच्या आगमनामुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण असून गौरीच्या सणासाठी महिला मोठया संख्येने माहेरी आल्या आहेत.  गौरीपूजन तसेच तिखटाचा सण केला जाईल. सोमवारी सायंकाळी गणपतीबरोबरच गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.