छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठवाडय़ात सुरू असणाऱ्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना मंगळवारीही सुरू होत्या. सकाळी घनसावंगी पंचायत समिती कार्यालयास आंदोलकांनी आग लावली, तर हिंगोली येथे उद्धव ठाकरे गटाचे नेते जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावरही दगडफेकीचा प्रकार झाला. नांदेड जिल्ह्यात नायगाव येथे गटविकास अधिकाऱ्यांची जीप जाळण्यात आली, तसेच याच गावात दोन रुग्णवाहिकांसह तेलंगणातील एका आमदाराची गाडी जाळण्याचा, तसेच एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
गावोगावी चक्का जाम आंदोलने सुरू होती. नांदेड, परभणी जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प होते. बीड आणि धाराशिव दोन जिल्ह्यात मंगळवारी संचारबंदी कायम होती. एका बाजूला हिंसाचार सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी भागात एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, धाराशिव जिल्ह्यात तुरोरी येथे सोमवारी रात्री पुणे – भालकी बस पेटवून देण्यात आल्याने जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली.
हेही वाचा >>>“त्या उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय”, इंटरनेट बंदीवरून मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, “आमच्या अंगावर…”
बीड जिल्ह्यात आंतरजाल सेवा बंद करण्यात आली होती. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या माजलगाव व बीड येथील घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या ४२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बीड व धाराशिव जिल्ह्यातील व्यवहार ठप्प होते. कर्नाटकातून येणारी बस वाहतूकही आता थांबविण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात रात्री भाजपचे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाला. दिवसभर विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू होते. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाची वाहतूक ठप्प होती. धाराशिव येथे कार्यकर्त्यांनी रेल्वेही रोखून धरली. परभणी शहरातील दुकाने बंद होती.
हेमंत पाटील यांचा राजीनामा
हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा मंगळवारी राजीनामा दिला. त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ासमोर बसून उपोषणास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्र्याची जरांगे यांच्याशी चर्चा हिंसक आंदोलन केल्यास वेगळा निर्णय घेऊ, असे जाहीर केल्यानंतर जरांगे यांनी पाणी पिण्यास सुरुवात केल्याने त्यांना बोलता येणे शक्य झाले. सोमवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी २४ मिनिटे चर्चा केल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली.
हेही वाचा >>>मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”
बसच्या काचा फोडल्या
बीड जिल्ह्यात सोमवारी हिंसक आंदोलनानंतर जमाव बसस्थानकामध्ये घुसला. तेथे उभ्या असणाऱ्या ७५ हून अधिक बसच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. अमरसिंह पंडित यांच्या घरावर चालून गेलेल्या जमावापैकी काही जणांनी गाडय़ा फोडल्याचे सांगण्यात येत आहे. पंडित यांचे घर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले.
शांततेच्या आंदोलनाचे ‘घोंगडी बैठकां’चे प्रारूप
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेत असतानाच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ४५ गावांमध्ये लोकशाही मार्गाने शांततेत ‘घोंगडी बैठकां’चे एक सकारात्मक प्रारूप मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाल्यानंतर त्यांच्या पुढील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील लाडसावंगी, पळशी विभागातील ४५ गावांमध्ये घोंगडी बैठकांचे आणि मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दररोज काही गावांमध्ये जाऊन तेथे घोंगडी बैठक घेऊन जनजागृती करण्यात येत असून त्याला गावपातळीवर महिला, तरुण-तरुणी, ज्येष्ठांसह सर्व जाती, धर्मामधील बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर /संगमनेर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठाण येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी कोलठाण-पोखरी शिवारात ही घटना घडली. मराठा आरक्षणासाठी शुभम अशोक गाडेकर (वय २४) याने आत्महत्या केली . संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सागर भाऊसाहेब वाळे (२५ वर्षे) याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली.
निर्णय झाला नाही, तर उद्यापासून पाणी घेणार नाही -जरांगे
जालना : मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची घोषणा उद्यापर्यंत करा आणि न्या. शिंदे समितीस राज्याचा दर्जा देऊन मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला नाही, तर बुधवारी संध्याकाळपासून आपण पाणी पिणे बंद करू, असा इशारा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे दिला. पाणी बंद केले, तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असे सांगून जरांगे-पाटील म्हणाले, की ओबीसींनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये. आपण पाणी सोडले, तर त्यास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यातही एक उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले. आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता.
धरपकड सुरु
कायदा आणि सुव्यवस्थेतेची स्थिती लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण बीड येथे तळ ठोकून आहेत. जाळपोळीच्या घटनेतील सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आंदोलकांची धरपकड आता पोलिसांनी सुरू केली आहे. यातील प्रमुख आरोपीच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले.
काय घडले?
’घनसावंगी येथील पंचायत समितीच्या कार्यालयास आग
’हिंगोली जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या घरावर दगडफेक
’ छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ वर्षांच्या शुभम अशोक गाडेकर या तरुणाची आरक्षण मागणीसाठी आत्महत्या
’परभणी, नांदेड, धाराशिव, बीड या जिल्ह्यांत कडकडीत बंद
’राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक पूर्णत: ठप्प