पालघर : नवी दिल्ली येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या संगीतमय स्वागतासाठी देशातील विविध भागातील ७८ वादकांच्या समूहाने स्वागत केले आहे. या समुहामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालूक्यातील सोनू म्हसे (६५) यांना घांगळी वादक म्हणून यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील सोनू ढवळू म्हसे हे कडाचीमेट (साकुर) या अतिशय दुर्गम आदिवासी भागातील रहिवासी असून अगदी लहानपणीपासून ते हे वाद्य वाजवीत असत.

वयाच्या १६ व्या वर्षापासून घांगळी वादन आदिवासी आवश्यक कला अवगत करून त्याची त्यांनी जोपासना केली आहे. आपल्या घांगळी वादनाच्या कलेच्या माध्यमातून आदिवासीची संस्कृती आणि निसर्गाची जोपासना करून त्याची अस्मिता कायम टिकून राहावी व आदिवासींच्या रुढी, परंपरा, संस्कृती व चालीरीती याचा प्रसार व प्रचार ते करीत आले आहेत.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार

हेही वाचा : VIDEO : “२५ वर्षात शिवसेनेची भाजपा झाली नाही, मग…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

घांगळी वादनासाठी त्यांना जिल्हा व राज्यातील विविध भागांसह गुजरात, दादरा नगर हवेली, मध्यप्रदेश, मणिपूर, सिक्कीम आदी भागांमध्ये यापूर्वी निमंत्रित करण्यात आले होते. जी-२० शिखर संमेलनासाठी त्यांना दिल्ली येथील सांस्कृतिक विभागाकडून निमंत्रण देण्यात आले होते. २८ ऑगस्ट रोजी ते दिल्लीसाठी रवाना होऊन सराव तसेच मान्यवरांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित राहिले. ते दिल्ली येथे मुक्कामी राहिले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंच्या जळगावातील सभेनं चार टकल्यांच्या मनात धडकी भरलीय”, संजय राऊतांचा रोख…

वारली समाजाचे पारंपरिक वाद्य

आदिवासी समाजातील एकूण ४७ अनुसूचित जमाती पैकी वारली या पोट जमातीचे घांगळी हे पारंपरिक वाद्य आहे. विणा सारखे दिसणारे वाद्य विविध सणांच्या वेळी, लग्न समारंभ व प्रार्थना करताना वापरले जाते. घांगळी वाद्य बनवण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केला जात असून दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी बांबूचा उपयोग केला जातो. भोपळ्याला मेणाने जोडले जाऊन त्यामधून नाद निर्माण करण्यासाठी बांबू वर तारा बसविल्या जातात. वाद्याच्या सुशोभीकरणासाठी मोरपीस, रंगीत बांगड्या, आरसा आदींचा वापर केला जात असून घांगळी हा तंतूवादनाचा प्रकार आहे.

हेही वाचा : “काही शिल्लक ठेऊ नकोस, बाजूला पेट्रोल पंप आहे, तेथून…”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याकडून गंभीर आरोप

काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या आदिवासी संस्कृती, रूढी परंपरा, लोककला टिकविण्यासाठी आदिवासी निसर्ग देवतेची पूजा, खळयावरचे देवाचे (कणसरी, धन-धान्य देवता) कार्यक्रम, गावदेवी तोरण उत्सव, कणसरी उत्सवाची मांडणी व पुजा करणे, घांगळी वाद्यावर गायन, गावठाण रक्षण, क्षेत्रपाल मखर, तोरण अशा सार्वजनिक व वैयक्तिक उत्सवात सोनू म्हसे हे २०० पेक्षा अधिक उत्सवामध्ये उत्साहात सहभागी झाले आहेत. घांगळी हे वाद्य वाजवून त्यावर गायन करणे हा सोनू म्हसे यांच्या कुटूंबात आजोबा व पणजोबा यांच्याकडून वंशपरंपरेने चालत आलेला अनमोल ठेवा गेल्या 45 वर्षांपासून ते जतन करुन आहेत. त्या आधारे ते समाजप्रबोधन करीत आले आहेत. इंटरनेटच्या युगात आदिवासी कला गडप होत असतांना एका अतिशय दुर्गम भागातील एका सामान्य व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदिवासींच्या पारंपारिक कलेचे जतन करुन घांगळी वाद्य वाजविण्याची वंशपरंपरागत कला जपली आहे.

Story img Loader