Arvind Sawant Apologise To Shaina NC : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शायना एन. सी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा दावा केला जात होता. याप्रकरणी शायना एन. सी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आता अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.

मुंबदेवी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत गेले होते. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी इथे इम्पॉर्टेड चालत नाही, ओरिजनल माल चालतो असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली. शायना एन. सी यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यावर टीका केली. आता अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
problem of traffic congestion in Mahabaleshwar created difficulties at many places
महाबळेश्वरला दिवाळी हंगामापूर्वीच वाहतूककोंडी
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले, “मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख आशिष शेलारांनी केला होता. त्यांच्यावर कोणतीही तक्रारी केली नव्हती. ठाण्यातही एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला. पण त्याविरोधातही गुन्हा दाखल झाला नाही. वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला का? संजय राठोडसारखा व्यक्ती तुमच्यासमोर आहे. राम कदम, गुलाबराव पाटील यांच्याविरोधात काय गुन्हे दाखल झाले?” असं अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा >> CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”

ते पुढे म्हणाले की, “माझं वक्तव्य असन्मानजनक असेल तर या सरवांनी केलेली वक्तव्ये तुम्हाला सन्मान देणारी वाटतात का?” असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले, “कोणाच्याही भावना दुखाव्यात, कोणत्याही भगिनीचा अवमान व्हावा असं माझ्या आयुष्यात मी कधी काही केलं नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.”

नेमकं प्रकरण काय?

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यावरून शायना एन. सी यांनी संताप व्यक्त केला. तसंच, राज्यभरातील विविध राजकीय नेत्यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली.

Story img Loader